

संगमनेर: राज्यातील महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत घुसमट आता तीव्र होत चालली असून या मतभेदांचा मोठा स्फोट लवकरच पाहायला मिळेल, असा दावा ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. ते बुधवारी( ता.१९) संगमनेर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.