Balasaheb Thorat
sakal
संगमनेर: ‘‘ माझ्या राजकीय जीवनात इतका गोंधळलेला निवडणूक आयोग मी कधीही पाहिलेला नाही, अशी कठोर टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. पूर्वीचे आयोग स्वायत्त असायचे, निर्णयाचा अधिकार त्यांच्या हातात असायचा आणि सत्ताधारीही त्यांच्या पुढे सावध असत. मात्र आता केंद्रापासून राज्यापर्यंत आयोग सत्तेच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.