

Thorat Accuses Government of Breaking Trust with Ladki Bahin Beneficiaries
sakal
संगमनेर: लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरविलेल्या महिलांशी राज्य सरकारने विश्वासघात केला. या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या मतांमुळेच सत्ताधाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत यश मिळाले. मात्र, निवडणुकीनंतर त्याच महिलांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.