संगमनेर : शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणींचा सातत्याने पाठपुरावा करणारे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवत सरसकट कर्जमाफीची तातडीने घोषणा करण्याची मागणी केली. शेतकरी कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबवण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका ही शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.