

Police officials examining bank records in connection with the ₹3.77 crore embezzlement case in Ahilyanagar.
Sakal
अहिल्यानगर: स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मुख्य शाखा, अहिल्यानगर येथे तीन कोटी ७७ लाख १ हजार ६१९ रुपयांच्या अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँकेतील सिनियर असोसिएटने आपल्या पदाचा गैरवापर करत हा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.