
Barshi fraud
- प्रशांत काळे
बार्शी : गुंजेवाडी सावरगाव(ता.तुळजापूर)येथील रामगिरी शुगर्स लिमिटेड साखर कारखाना बार्शीच्या डिसले,आंधळकर यांनी भागीदारीमध्ये घेतल्यानंतर आंधळकरांनी ४९ टक्के शेअर विक्री करुन नियुक्त केलेल्या कार्यकारी संचालक मंडळाने बनावट बैठका,कागदपत्रे तयार करुन कारखान्याच्या जमिनीचे परस्पर गहाणखत करुन जमिनीवर बोजा चढवत २ कोटी १० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.