सावधान! अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे ११५ रुग्ण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात रुग्ण घटले अन्‌ लसीकरणही मंदावले
सावधान! अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे ११५ रुग्ण!

सावधान! अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे ११५ रुग्ण!

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत (ahmednagar district corona cases) बुधवारी (ता. ५) मोठी वाढ झाली. दिवसभरात ११५ नवीन रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर शहरात सर्वाधिक २१ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (government hospital in ahmednagar) प्रयोगशाळेत ४७, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ५२ आणि अँटिजेन चाचणीत १६ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या तीन लाख ५९ हजार ३३० झाली आहे. सध्या ४३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या पोर्टलवर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सात हजार १५६ झाली आहे.

हेही वाचा: सोलापुरात उरले 307 रुग्ण ! आज 20 ठिकाणी आढळले 30 पॉझिटिव्ह; आतापर्यंत नऊ हजार 780 रुग्ण बरे झाले

नगर तालुका रुग्ण संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. १५ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुका रुग्ण संख्येत तिसऱ्या क्रमांकावर आला असून दहा रुग्ण आढळून आले. श्रीगोंदे नऊ, पारनेर व पाथर्डीत प्रत्येकी आठ, अकोले सात, शेवगाव, राहाता आणि श्रीरामपूरमध्ये प्रत्येकी सहा, भिंगार चार, कर्जत व राहुरी प्रत्येकी तीन, कोपरगाव व नेवासे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. बाहेरील जिल्ह्यांतील चार, तर परराज्यांतील तीन रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनातून बरे झालेल्या ६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तीन लाख ५१ हजार ७४१ रुग्ण बरे झाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ahmednagar
loading image
go to top