श्रीक्षेत्र सराला बेट येथील सप्ताहाचा ‘असा’ घ्या घर बसला लाभ

गौरव साळुंके
Monday, 20 July 2020

योगिराज सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या १७३ व्या अंखड हरिनाम सप्ताहाचा ध्वजवंदन सोहळा श्रीक्षेत्र सराला बेट येथे प्रशासकीय नियमांचे पालन करुन पार पडला.

श्रीरामपूर (अहमदनगर) : योगिराज सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या १७३ व्या अंखड हरिनाम सप्ताहाचा ध्वजवंदन सोहळा श्रीक्षेत्र सराला बेट येथे प्रशासकीय नियमांचे पालन करुन पार पडला. यावेळी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पुजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महसुलमंत्री बाळासाहेब थोरात होते.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सप्ताह सोहळा प्रशासकीय नियमांचे पालन करुन साध्या पद्धतीने श्रीक्षेत्र सराला बेट परिसरात साजरा होत आहे. प्रशासकीय नियमांनुसार सोशल डिस्टसिंगचे पालन करुन सप्ताह साजरा होत असल्याने भाविकांनी बेटावर येण्याचा प्रयत्न करु नये. खबरदारी म्हणुन प्रशासाने सप्ताह काळात बेट ताब्यात घेतले. भाविकांनी घरी राहुन ऑनलाईन प्रवचानाचा लाभ घ्यावा. 

हेही वाचा : शेवगाव झाले लॉकडाऊन... असे आहेत नियम
यंदाच्या सप्ताहात बेटातील विद्यार्थी वर्गासह भक्तमंडळ व महाराज सोशल डिस्टसिंग ठेवुन भजन, प्रवचन करुन सप्ताह साजरा करीत आहे. सर्व भाविकांनी कोरोनाच्या काळात प्रशासकीय नियमांचे पालन करावे. सप्ताह काळात बेटावर गर्दी होणार नाही, यांची सर्वांनी नोंद घ्यावी. यंदाच्या सप्ताह सोहळ्यात प्रशासकीय नियमांचे पालन करुन बेटाला सहकार्य करावे, असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे.

दरम्यान, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नियमांचे पालन करुन यंदाचा सप्ताह करण्याच्या सुचना दिल्या. सप्ताह काळात बेटावर गर्दी होणार नाही. यांची प्रशासनासह भाविकांनी खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी सप्ताह समितीचे अध्यक्ष आमदार प्रा. रमेश बोरनारे, कमलाकर कोते, संदीप पारख, बाळकृष्ण कापसे, बाबासाहेब चिडे, सचिन गुजर, अशोक बोरुर्डे, किशोर थोरात उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beginning of 173rd week of Yogiraj Sadguru Gangagiri Maharaj of Shrirampur taluka