
श्रीरामपूर : बेलापूर येथील कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला. गॅस कटरच्या साह्याने मशिन तोडण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यांना अपयश आल्याने चोरटे रिकाम्या हाताने पळाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ही घटना रविवारी घडली.