चोरीच्या आरोपावरून बेलापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

गौरव साळुंके
Thursday, 24 December 2020

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करीत कर्मचाऱ्यांची समजूत काढली. आंदोलन मागे घेल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला.

श्रीरामपूर ः तालुक्‍यातील बेलापूर ग्रामपंचायतीचे विविध साहित्य चोरीची चर्चा पसरल्यावर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून बेलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी ग्रामपंचायतीच्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. 

चौकशीदरम्यान ग्रामपंचायतीचे विविध साहित्य कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील खोलीत आढळून आले. त्यामुळे चुकीचे आरोप करून गुन्हे दाखल केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज सकाळी काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा सकाळी बंद होता.

हेही वाचा - फेसबुकवर तुम्ही बड्या अधिकाऱ्याचे मित्र आहात का, तर मग वाचा ही बातमी

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करीत कर्मचाऱ्यांची समजूत काढली. आंदोलन मागे घेल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. सर्व घडामोडीनंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यातील चोरीची तक्रार मागे घेत, साहित्य मिळाल्याचा जबाब दिला. 

प्रशासक, कर्मचाऱ्यांनी यापूर्वी स्वच्छता पाहणी दौर केला होता. त्यावेळी सुभाषवाडी तळ्यावरील विजेचे नादुरूस्त कंडक्‍टर स्टोअर रूममध्ये ठेवले होते. मात्र, आता ते मिळत नसल्याने ग्रामपंचायतीचे विविध साहित्य चोरी गेल्याच्या चर्चेला उधाण आले. त्यामुळे बेलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून काल दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, हे साहित्य ग्रामपंचायत कार्यालयातच आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belapur Gram Panchayat employees' agitation