Ahilyanagar News: 'बेलापूरच्या ग्रामसभेत घरकुलावरून रणकंदन'; माईक ओढाओढी, आरडाओरड्याने तणाव, पोलिस कुमक तातडीने दाखल

Belapur Gram Sabha Turns Stormy: ग्रामपंचायतीच्या प्रांगणात झालेल्या सभेत ‘तू-तू, मैं-मैं’, माईक ओढाओढी, एकमेकांवर झडप घालण्याचा प्रयत्न, घोषणाबाजी झाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत राज्य राखीव दालाची तुकडी बोलावली. तब्बल पाच तास सुरू असलेल्या या गोंधळामुळे कामकाज अक्षरशः ठप्प झाले.
Stormy Belapur Gram Sabha: Housing scheme sparks tension, police intervene.
Stormy Belapur Gram Sabha: Housing scheme sparks tension, police intervene.Sakal
Updated on

श्रीरामपूर: बेलापूर ग्रामसभेत गुरुवारी घरकुल योजनेवरून अक्षरशः रणकंदन झाले. ‘लाभार्थ्यांकडून एक लाख रुपये मागितले जात आहेत,’ असा थेट आरोप माजी सरपंच महेंद्र साळवी, सुधीर नवले, भरत साळुंखे यांनी केल्यानंतर ग्रामसभा गोंधळात परिवर्तित झाली. गायकवाड वस्तीतील महिलांनी ‘आमच्या नावावर सात-बारा उताऱ्यासह जमीन द्या, आम्ही कसलेही पैसे देणार नाही,’ अशी घोषणा करताच वातावरण तापले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com