बेलवंडी बनतेय कोरोना हॉटस्पॉट, रूग्णसंख्या वाढतीच

Corona
Corona

श्रीगोंदे : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण कमी होत असतानाच, बेलवंडी येथे मात्र संख्या कमी होत नसल्याने गावकरी व प्रशासन चिंतेत आहे. गावात आजही ॲक्टिव्ह ४८ रुग्ण आहेत. रुग्णसंख्या वाढण्याची कारणे शोधून गावकऱ्यांनी आता कोरोनाच्या हद्दपारीसाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, शासकीय यंत्रणा गावात नेमकी काय करते, याचाही शोध घ्यावा लागणार असल्याने, अधिकाऱ्यांनी बेलवंडीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

तालुक्यात काष्टीनंतर आता बेलवंडी आर्थिक सुबत्ता असणारे गाव होत आहे. तेथील व्यापार, शेतीउत्पादन व राजकारण वाढत असतानाच आता कोरोनाही वाढतोय, ही चिंतेची बाब आहे. गावात आतापर्यंत कोरोनाबाधित ७०० रुग्ण आढळले आहेत. सध्या अॅक्टिव्ह ४८ रुग्ण असून, २१ जणांना जीव गमवावा लागला आहे. (Belwandi Corona hotspot in Shrigonda taluka)

Corona
महाबीज कर्जत-जामखेडमध्ये घेणार उडदाचे बीजोत्पादन

गावकऱ्यांनी एकत्र येत काही उपाययोजना केल्या; मात्र तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचे वास्तव आहे. ग्रामपंचायत पुरेपूर प्रयत्न करीत आहे. तथापि, कोरोना चाचण्या करण्यास लोक घाबरले आहेत का, याचा शोध प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. गावात जागृती करीत असून, काही वेळा एकाच रुग्णाचे नाव दोन वेळा आल्याने आकडा फुगल्याचे दिसत आहे. दुकानांची वेळ कमी केली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरच कमी होईल.

- सुप्रिया पवार, सरपंच

तालुक्यात कोरोना आटोक्यात येत असताना बेलवंडीत मात्र रुग्ण वाढत असल्याचे वास्तव आहे. आम्ही तेथील वास्तव समजून घेत असून, गावकऱ्यांशी संवाद साधत आहोत. लवकरच कोरोना हद्दपार होईल.

- डॉ. नितीन खामकर, तालुका वैद्यकीय अधिकारी

(Belwandi Corona hotspot in Shrigonda taluka)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com