

Bhandardara Dam News Historic Reservoir Nears 100 Years Calls Grow for Conservation and Restoration
sakal
अकोले : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ऐतिहासिक क्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशय (भंडारदरा) शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहे. ब्रिटिशकालीन अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धरणाने शतकभर महाराष्ट्राला पाणी, वीज आणि समृद्धी दिली. मात्र, शताब्दी सोहळ्याची चाहूल लागत असतानाच या ऐतिहासिक वारशाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.