Bhandardara Dam : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी, धरणात ७६ टक्के पाणीसाठा

भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे भंडारदरा धरणात ८३८० दशलक्ष घनफूट (७५.९१ टक्के) साठा
Bhandardara Dam
Bhandardara Damsakal

अकोले : भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे भंडारदरा धरणात ८३८० दशलक्ष घनफूट (७५.९१ टक्के) साठा झाला आहे. निळवंडे जलाशयात ३०३६ दशलक्ष घनफूट (३६.४५ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

यंदा भंडारदऱ्याला पावसाचे उशिरा वेध लागले. जून महिन्याच्या सरतेशेवटी पाऊस सुरू झाला. शहरी भागात कमी पाऊस असला, तरी सह्याद्रीचा पाऊस म्हणजे पर्यटनाची पर्वणीच समजली जाते. ओल्या झालेल्या निसरड्या रानवाटा, चिंब भिजलेली जंगले,

जंगलातील नागमोडी वळणे, खळखळत कोसळणाऱ्या धबधब्यांचा, निसर्गसफरीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले आपसुकच वळतात. मुळा नदीच्या खोऱ्यातील कोथळे (१८२ दशलक्ष घनफूट), शिरपुंजे (१५५ दशलक्ष घनफूट) हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले.यानंतर बलठण तलावही ओव्हर-फ्लो झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com