esakal | भंडारदरा जलाशय पूर्ण भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Bhandadara filled up full of capacity

भंडारदरा जलाशय पूर्ण भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (जि. अहमदनगर) : भंडारदरा (Bhandadara) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने आज रविवारी सकाळी साडेदहा वाजता पूर्ण क्षमतेने जलाशय भरले असून जलसंपदा विभागाने स्पिल्वेचे (Spillway) गेट उघडुन २४३६ व वीज केंद्रातून ८३० क्यूसेकने पाणी सोडून क्रांतिवीर राघोजी भांगरे तथा भंडारदरा जलाशय भरल्याचे जाहीर केले.

भंडारदरा जलाशय भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने रतनवाडी, पांजरे, घाटघर, भंडारदरा, वाकी, परिसरात सलग दोन दिवस पाऊस असल्याने भंडारदरा जलाशयात वेगाने आवक झाल्याने जलाशय आज सकाळी साडेदहा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरवर्षी १५ ऑगस्ट पूर्वी जलाशय भरते मात्र या वर्षी जलाशय १२ सप्टेंबर रोजी भरले असून जलाशयातून पाणी सोडण्यात येत असल्याने दोन्ही वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहेत; तर वाकी जलाशयातून ८९० क्युसेकने कृष्णवंती नदीला पूर आला आहे. त्यामुळे रंधा धबधबा अवतीर्ण झाला असून निळवंडे जलाशय लवकरच भरेल असा विश्वास जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख यांनी दिली. तालुक्यातील ११पैकी ९ लघु पाटबंधारे प्रकल्प भरले असून आज भंडारदरा जलाशय भरले असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. स्पिल्वेल्वे मधून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे देशमुख म्हणले.

हेही वाचा: वेठबिगारीतून सुटका अन् घेतली भरारी! माळरानावर फुलवलं नंदनवन

जलसंपदा विभागाने स्पिल्वेचे गेट उघडुन २४३६ व वीज केंद्रातून ८३० क्यूसेकने पाणी सोडून क्रांतिवीर राघोजी भांगरे तथा भंडारदरा जलाशय भरल्याचे जाहीर केले.

जलसंपदा विभागाने स्पिल्वेचे गेट उघडुन २४३६ व वीज केंद्रातून ८३० क्यूसेकने पाणी सोडून क्रांतिवीर राघोजी भांगरे तथा भंडारदरा जलाशय भरल्याचे जाहीर केले.

यावेळी स्थानिक ग्रामस्थ व राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे यांनी सपत्नीक पूजन करून जलाशयाला साडी चोळी श्रीफळ अर्पण केले. यावेळी सरपंच दिलीप भांगरे, वकील अनिल आरोटे उपस्थित होते. जलपूजन करताना अशोक भांगरे यांनी समाधान व्यक्त करून कोरोनामुळे (Corona) तालुक्यातील जनता हैराण झाली असून येथील व्यवसायिकांना पर्यटक वाढल्याने रोजगार मिळेल.

हेही वाचा: शेतजमीन हिरावून घेतली जाणार नाही : लहामटे

loading image
go to top