भाजपने जपली माणुसकी, तृतीय पंथियांना मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

शहर जिल्हाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यापासून त्यांनी नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी त्यांनी केलेला कार्यक्रमही चर्चेचा विषय ठरला.

नगर : ""जगात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी यामध्ये जीव गमावला आहे. सर्वांनी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढेल अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. कोरोनाच्या महामारीत माणुसकीचा धर्म महत्त्वाचा आहे,'' असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले. 
भाजपतर्फे अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक, रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधाचे वाटप सुरू आहे. तृतीयपंथीयांच्या प्रमुख काजल गुरू यांच्याकडे ही औषधे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सुपूर्द केली.

सरचिटणीस महेश नामदेव, सोशल मीडिया संयोजक हुझेफा शेख, युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश नाकाडे, सचिव अभिषेक वराळे, मंदार गंधे आदी उपस्थित होते. 

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांनी यापूर्वी कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील सर्वांनाच अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले. ज्या लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचत नाहीत, त्यांना या गोळ्यांची नितांत गरज आहे. ते काम महेंद्र गंधे करीत आहेत.

शहर जिल्हाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यापासून त्यांनी नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी त्यांनी केलेला कार्यक्रमही चर्चेचा विषय ठरला. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कोणताही गटतट न बाळगता त्यांनी एकाच व्यासपीठावर आणले. ही पक्षाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Bharatiya Janata Party helped third parties