
सोनई : सर्व रूढी, परंपरा, संस्कार आणि संस्कृतीने नटलेल्या भारत देशात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, तसेच येथील संत परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कौटुंबिक कार्य करताना जपलेले संस्कार व पवित्र गोमातेचे रक्षण करण्यात सुद्धा पंढरीची वारी केल्याचे पुण्य आहे, असे विचार देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केले.