

“Bhojapur project joins river-linking plan — Minister Vikhe Patil launches canal and flood channel works.”
Sakal
संगमनेर: भोजापूर प्रकल्पाचा समावेश आता दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे. यासाठी १३ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प महायुती सरकारने केला आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करण्याचे काम सुरू झाले आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.