esakal | श्रीरामपूर पंचायत समितीच्या नुतन इमारतीचा भुमिपूजन सोहळा वादाच्या विळख्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Bhumi Pujan ceremony of the new building of Shrirampur Panchayat Samiti has been found in the midst of controversy.jpg

एकीकडे राज्य सरकारवर आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजावर टिका करायची आणि दुसरीकडे शासकीय विकास कामांचा शुभारंभ करायचा असा दुहेरी खेळ जनता ओळखून आहे.

श्रीरामपूर पंचायत समितीच्या नुतन इमारतीचा भुमिपूजन सोहळा वादाच्या विळख्यात

sakal_logo
By
गौरव साळुंखे

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे भुमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार असले तरी काॅंग्रेस सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने हा कार्यक्रम वादाच्या विळख्यात सापडला आहे. पंचायत समितीच्या नुतन इमारतीसाठी पाच कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला असून इमारतीचे भुमिपूजन राज्यमंत्री सत्तार यांच्या हस्ते आणि माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन केले आहे. खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आमदार लहू कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांची प्रमुख उपस्थित राहणार असल्याचे सभापती संगिता शिंदे आणि उपसभापती बाळासाहेब तोरणे यांनी सांगितले.

दरम्यान, विरोधी काॅंग्रेस पक्षाच्या सदस्यांनी सदर कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून यासंदर्भात सायंकाळी उशिरा प्रसिद्ध पत्रक काढले आहेत. येथील पंचायत समितीच्या कार्यालयाला राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेमार्फत निधी मंजूर झाला. नुतन इमारतीच्या भुमिपूजन सोहळ्याला भाजपाचे आमदार कशी उपस्थिती लावणार, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार आहे.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व जनहितांचे निर्णय घेतले जात आहे. राज्याच्या धर्तीवर नगर जिल्हा परिषदेत तीनही पक्षांनी एकत्र येवून अध्यक्षपदी राजश्री घुले यांची निवड केली. त्यामुळे घुले यांनी अल्पावधीतच आपल्या विकास कामाचा ठसा उमटला आहे. अशी परिस्थिती असताना भाजपात नुकत्याच दाखल झालेल्या काही नेतेमंडळी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर नेहमी टीका करीत असतात.

एकीकडे राज्य सरकारवर आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजावर टिका करायची आणि दुसरीकडे शासकीय विकास कामांचा शुभारंभ करायचा असा दुहेरी खेळ जनता ओळखून आहे. त्यामुळे काॅंग्रेसचे सदस्य भुमिपूजन सोहळ्याला अनुउपस्थित राहून बहिष्कार टाकल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा दिघे, मंगल पवार, पंचायत समिती सदस्य अरुण नाईक, डाॅ. वंदना मुरकुटे, विजय शिंदे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

loading image
go to top