मोठी बातमी ः नगरने पार केला एक हजाराचा आकडा, दिवसात सर्वाधिक ७२ कोरोना रूग्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

रात्री जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत आज सायंकाळी ४९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा आता तब्बल १ हजार ३५ झाला आहे. सावधगिरी न बाळगल्यास ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.​

नगर ः नगरकरांच्या बेफिकीरीमुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतो आहे. आजच्या दिवसभरात तब्बल ७२ रूग्ण बाधित निघाले. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्याच्याच काळजाचा ठोका चुकला आहे.

रात्री जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत आज सायंकाळी ४९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण आकडा आता तब्बल १ हजार ३५ झाला आहे. सावधगिरी न बाळगल्यास ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी ०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ४३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३६३ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ७२ रुग्णांची भर पडली.

जिल्हा रुग्णालयात अहवालानुसार, कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील ३ तर श्रीगोंदा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर ११ (घुलेवाडी २,  मालदाड रोड ०३, भारत नगर ०१, जनता नगर ०१, निमोण ०२, जोर्वे रोड रहमद नगर ०१, अरगडे गल्ली ०१).

हेही वाचा - आजच्याच दिवशी घडले होते कोपर्डीचे क्रौर्य

नगर मनपा १७  (विनायक नगर ०४, शाहुनगर केडगाव ०१,  श्रीराम नगर ०१,  सुभेदार गल्ली ०१, भवानीनगर ०१, सावेडी ०३, कावरे मळा ०१, नगर शहर ०५)

नगर ग्रामीण ०२ (पोखर्डी ०१, पितळे कॉलनी, नागापूर ०१), राहाता ०४ (शिर्डी ०१, पिंपरी निर्मळ ०१, सोनगाव पठारे ०१, कानकुरी ०१), राहुरी ०३ ( म्हैसगाव ०१ तामर खेडा ०१, राहुरी शहर ०१) 
श्रीगोंदा ०२ (चिखली ०१, श्रीगोंदा ०१) 
 श्रीरामपूर ०१ (ममदापूर), अकोले ०१, भिंगार ०१, पाथर्डी ०१ (त्रिभुवनवाडी)
 
दरम्यान, आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण ७२ रुग्णांची नोंद झाली.

उपचार सुरू असलेले रुग्ण: ३६०
बरे झालेले रुग्ण: ६४९
मृत्यू: २६
एकूण रुग्ण संख्या: १०३५

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big news: One thousand corona patients in Ahmednagar