बोटा येथील एका तरूणाची दुचाकी गेली चोरीला

शांताराम जाधव 
Thursday, 19 November 2020

काही कामासाठी बाहेर गेलेला अक्षय दुचाकी घेण्यासाठी परत आला असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेल्याचे लक्षात आले.

बोटा (अहमदनगर) : गेले काही महिन्यांपासून दुचाकी चोरीचे प्रकार अद्यापही सुरू असताना शनिवारी संगमनेर तालुक्यातील बोटा येथील अक्षय कालीदास शेळके या तरूणाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना शनिवार (14 नोंव्हेबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

हे ही वाचा : आमदार रोहित पवार यांनी घातलं संत गोदड महाराज यांना साकडं

पठारभागातील दुचाकीस्वारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोटा येथील अक्षयने आपली दुचाकी क्रमांक एम.एच 12 एच वाय 8740 ही एका हाॅटेल समोर लावली होती. दरम्यान, काही कामासाठी बाहेर गेलेला अक्षय दुचाकी घेण्यासाठी परत आला असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेल्याचे लक्षात आले. अक्षयने दुचाकीचा शोध सगळीकडे घेतला पण तरीही दुचाकी न सापडल्याने याप्रकरणी अक्षय शेळके याने दिलेल्या फिर्यादी वरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा : कोपरगावात गोरगरिबांसाठी मोफत दातांची तपासणी

पुढील तपास पोलिस हेडकाॅन्सटेबल कैलास देशमुख करत आहे. यापूर्वीही घारगाव, बोटा, साकूर, बिरेवाडी येथून दुचांकीबरोबरच घरफोड्या, विद्युत मोटारी, जनावरे चोरीचे सत्र सुरू असताना आता पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढले. अशा अज्ञात चोरांचा बंदोबस्त व्हावा, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bike of a youth from Botha has been stolen