कोपरगावात गोरगरिबांसाठी मोफत दातांची तपासणी

मनोज जोशी 
Thursday, 19 November 2020

डॉ. कृष्णानी यांनी अल्पदरात सेवा देण्याचे ठरवले असून त्यांची ही मानव सेवा म्हणजे ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन सर्व धर्मगुरूंनी केले.

कोपरगाव (अहमदनगर) : गोरगरीब जनतेची सेवा व्हावी, हा उदात्त हेतू ठेवून डॉ.अंकित कृष्णानी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी गरजूंसाठी मोफत तपासणी करणार आहे  त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. कृष्णानी यांनी अल्पदरात सेवा देण्याचे ठरवले असून त्यांची ही मानव सेवा म्हणजे ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन सर्व धर्मगुरूंनी केले.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे किल्क करा 

डॉ.अंकित कृष्णानी यांच्यावर श्री श्री रविशंकर यांचा प्रभाव व आशीर्वाद असून त्यांच्या आदेशाने त्यांनी श्री श्री दाताच्या दवाखान्याचे नुकतेच उदघाटन सर्व धर्मगुरूंच्या हस्ते केले.

या कार्यक्रमावेळी आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, भाजपाचे प्रांतिक सदस्य रवींद्र बोरावके, ज्येष्ठ वकील जयंत जोशी, नगरसेवक जनार्दन कदम, विजय वाजे, मंगेश पाटील, अशोक खांबेकर, डॉ. आतिश काळे, बांधकाम व्यवसायिक प्रसाद नाईक, माजी नगरसेवक दिनार कुदळे नगरसेवक संदीप वर्पे, डॉ. भरत बंब, गौतम बँकेचे माजी अध्यक्ष सतीश कृष्णानी, श्याम कृष्णानी, इंद्रकुमार कृष्णानी व महिला परिवार विविध स्तरातील मान्यवरांनी डॉक्टर कृष्णांनी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Ankit Krishnani of Kopargaon will conduct free check ups for the needy on the first and third Thursday of every month