esakal | राष्ट्रवादी आमदारावर कट्टर भाजप कार्यकर्ते प्रभावित! मोठ्या संख्येने थेट राष्ट्रवादीत एंट्री
sakal

बोलून बातमी शोधा

ncp

राष्ट्रवादी आमदारांच्या कामावर भाजप कार्यकर्ते प्रभावित!

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (जि.अहमदनगर) : शहरातील भाजपचे (BJP activists) कट्टर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराच्या (NCP MLA) कामावर प्रभावित होत राष्ट्रवादीत एंट्री केली आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या 'त्या' आमदारांची काम करण्याची कार्यपद्धती पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. अन् आम्ही स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्याचे सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे समजते..

म्हणून आम्ही राष्ट्रवादीत केला प्रवेश...

शहरातील भाजपचे कट्टर कार्यकर्ते मनोज नरोडे व जितेंद्र गोडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार काळे यांची काम करण्याची कार्यपद्धती पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन असलेले लोकप्रतिनिधी आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने लाभले. त्यांच्या दोन वर्षांच्या कामाचा धडाका पाहता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास स्वयंस्फूर्तीने पुढे आल्याचे नरोडे व गोडसे यांनी सांगितले

हेही वाचा: उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यात अलिशान कार! किंमत वाचून व्हाल थक्क

विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार

याप्रसंगी आमदार काळे बोलत होते की, शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची माझी भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून महत्त्वाच्या विकासकामांना प्रारंभ होणार आहे. शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. शहरातील तरुणाईकडेदेखील विकासाच्या नवनवीन कल्पना आहेत. त्यांच्या कल्पनेतील विकास प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

हेही वाचा: तेव्हा भाजप नेत्यांनी माझ्या जावयाला 'ड्रगडीलर' ठरवलं - मलिक

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, मेहमूद सय्यद, दिनार कुदळे, कृष्णा आढाव आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top