esakal | तेव्हा भाजप नेत्यांनी माझ्या जावयाला 'ड्रगडीलर' ठरवलं; नवाब मलिकांचा NCB वर गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik

तेव्हा भाजप नेत्यांनी माझ्या जावयाला 'ड्रगडीलर' ठरवलं - मलिक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : गांजा म्हणून तंबाखू ताब्यात घेऊन माझ्या जावयाला अटक केली. माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. जावयाकडे हर्बल तंबाखू सापडल्याचं कोर्टाच्या ऑर्डरमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो की नाही?, असा सवाल राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी NCB ला केला आहे. याप्रकरणी माझा जावई उच्च न्यायालयात जाणार आहे, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं. बेलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादी भवन येथे आज नवाब मलिक यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी त्यांनी NCB वर गंभीर आरोप केलेत.

एनसीबी फर्जिवाडा करत आहे - मलिक

एनसीबीच्या छाप्यात 200 किलो गांजा मिळाला नाही. साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे. अशा संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला टेस्ट करण्याचे किट्स असतात. गांजा नसतानाही लोकांना फ्रेम करण्यात आलं. हे मी सांगत नाही तर कोर्टाचा रिपोर्ट सांगत आहे. 27 अ हे कलम लागू होत नाही. जो काही खटला फर्निचरवाल्यावर लागतो. पण त्याला लगेच जामीन दिला. हर्बल तंबाखू सापडल्यानंतरही लोकांना फ्रेम केलं जात आहे. सिलेक्टिव्ह खबर लिक करून लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे. एनसीबी फ्रेम करण्याचं काम करत आहे. एनसीबी फर्जिवाडा करत आहे, असंही मलिक यांनी सांगितलं. 'एनसीबीची आणखी एक पोलखोल' या विषयावर ही पत्रकार परिषद घेण्यात आली असून नवाब मलिकांकडून NCB विरोधात नवा गोप्यस्फोट करण्यात आला आहे.. याप्रकरणावरील मलिक यांची ही तिसरी पत्रकार परिषद आहे.

हेही वाचा: "अजूनही मीच मुख्यमंत्री..." अखेर फडणवीसांचे स्पष्टीकरण

नवाब मलिकांची तीव्र नाराजी, NCB वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

कायदा सर्वांना समान असून याठिकाणी माझ्या जावयाला मात्र ८ महिने तुरुंगात जावे लागले. माझ्या लेकीला धक्का सोसावा लागला. कोर्ट ऑर्डर मध्ये माझं नाव घेऊन बातम्या चालल्या माझी मुलगी अन् तिच्या दोन्ही मुलांवर याचा परिणाम झाला. मुलं समाजात बाहेर जायला तयार नव्हती असे सांगत नवाब मलिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

हेही वाचा: लवकर बरे व्हा! PM मोदींकडून मनमोहन सिंगांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना

फोनवर धमकी मिळाल्याचा दावा

नऊ जानेवारी करणं सजलानी वांद्रे इथे रेड झाली. ncb ने पत्रकारांना सांगितलं. 200 किलो गांजा ताब्यात घेतल्याची बातमी दिली. त्याच दिवशी 9 जानेवारी NCB ने पत्रकारांना गांजा फोटो आणि माहिती दिली. 9820111409 यावरून ब्रिटिश नागरिक अटक केली. त्याला मिडियामधून प्रसिद्धी दिली. कायदा सर्वांसाठी समान असून असा भेदभाव का? असा आरोप मलिकांनी केला आहे.

नवाब मलिक यांना व्हाय प्लस सुरक्षा

सुत्रांच्या माहितीनुसार आता नवाब मलिक यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. चार बंदुकधारी जवान, पायलट कार अश्या सिक्युरीटीचा समावेश असून मलिक यांच्या घरीही चार जवान तैनात असणार असल्याची माहिती मिळते. याआधी नवाब मलिकांच्या सुरक्षेत केवळ एक जवान होता. मात्र आता मुंबई क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीवर गंभीर आरोप केल्यानंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली असल्याचे समजते

loading image
go to top