esakal | उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यात नवी कोरी अलिशान कार! किंमत वाचून व्हाल थक्क..
sakal

बोलून बातमी शोधा

udyanraje

उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यात अलिशान कार! किंमत वाचून व्हाल थक्क

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सातारा : भाजपचे राज्यसभा (BJP MP) खासदार उदयनराजे भोसले उदयनराजे भोसलेंना (Udayan Raje Bhosale) वेगवेगळ्या कारचा छंद असल्याचे सर्वांनाच माहित आहे. त्यांच्या गाड्यांच्या कलेक्शनचे बरेच चाहते आहेत. विजयादशमीच्या मुहूर्तावर एक नवीन कोरी कार खरेदी केली असून त्यांनी कारसाठी लकी नंबरही घेतला आहे.. या कारची किंमत वाचून तुम्हीही थक्क व्हाल...सध्या सोशल मीडियावर याबाबतचे फोटो व्हायरल झाले...

नव्या कारसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर

भाजपचे राज्यसभा (BJP MP) खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या गाड्यांच्या कलेक्शनचे बरेच चाहते आहेत. आतापर्यंत उदयनराजे यांच्या ताफ्यात ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी या चार आलिशान कार होत्या. आता त्यांच्या ताफ्यात नवी कारची एंट्री झाली आहे. त्यांनी नव्या कारसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता त्यांच्या ताफ्यात नुकतीच बीएमडब्ल्यू (BMW) कारची भर पडली आहे. त्यांनी पुण्यातून (Pune) बीएमडब्ल्यू गाडी विकत घेतली. बीएमडब्लू या कंपनीची TEX 5 ही गाडी विकत घेतली. उदयनराजे भोसले यांच्या गाडीचा नंबरही 007 असा आहे. नव्या बीएमडब्लू कारला MH 11 D D 007 हाच नंबर घेतला आहे.

हेही वाचा: तेव्हा भाजप नेत्यांनी माझ्या जावयाला 'ड्रगडीलर' ठरवलं - मलिक

सातारकरांना उत्सुकता

बीएमडब्लू कंपनीची एक्स फाईव्ह ही नवीन कोरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये आहे. त्यांनी नव्या कारसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये असून त्यांनी या ही कारला एमएच ११ डी डी ००७ हा त्यांचा सध्या सोशल मीडियावर याबाबतचे फोटो व्हायरल झाले असून महाराजांची ही अलिशान नवीन गाडी साताऱ्यात कधी येणार याची उत्सुकता सातारकरांना लागली आहे.

हेही वाचा: मला चित्रा वाघ यांच्या टि्वटबद्दल काही बोलायचं नाही - रुपाली चाकणकर

उदयनराजेंच्या स्टाईलचे चाहते

आतापर्यंत उदयनराजे यांच्या ताफ्यात ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी या चार आलिशान कार होत्या. त्यात आता बीएमडब्लूची भर पडली आहे. त्यांच्या पत्नी दमयंतीराजे यांच्याकडे पोलो ही कार आहे. उदयनराजेंची तरुणाईत भलतेच 'फेमस' आहेत. सोशल मिडियावर तर त्यांचे लाखो फाॅलोवर असून त्यांच्या स्टाईलची अनेक जण काॅपी करतात. साताऱ्यात उदयनराजेंचे समर्थक जेव्हा नवीन गाडी विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच. अनेक वेळा स्वतः उदयनराजेंनी त्याची रायडिंग केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

loading image
go to top