भाजपची विद्यार्थी आघाडी जाहीर; सहा उपाध्यक्ष, चार सरचिटणीस

संजय आ. काटे
Sunday, 6 September 2020

भारतीय जनता पक्षाची श्रीगोंदे तालुका विद्यार्थी आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

श्रीगोंदे (अहमदनगर) : भारतीय जनता पक्षाची श्रीगोंदे तालुका विद्यार्थी आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सहा उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, सहा चिटणीस, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, संपर्कप्रमुख, प्रसिद्धिप्रमुख, संघटन सरचिटणीस, कार्यालयीन चिटणीस अशा 22 जणांचा समावेश असल्याची माहिती विद्यार्थी तालुकाध्यक्ष रोहित गायकवाड यांनी दिली. 

कार्यकारिणी अशी : तालुका कार्याध्यक्ष प्रशांत पवार, कोषाध्यक्ष कृष्णा माळवदकर, संपर्कप्रमुख सागर शिपलकर, प्रसिद्धिप्रमुख संकेत वाळके, संघटन सरचिटणीस संकेत कोठारे, कार्यालयीन चिटणीस विशाल करनोर, सरचिटणीस संदीप जाधव, किरण बाबर, प्रवीण गंगाधरे, नाना गदादे, उपाध्यक्ष शुभम शेळके, सौरभ पंदरकर, दीपक बांदल, सुहास ओहोळ, राहुल शेंडे, अनिकेत ओहोळ. चिटणीसपदी दीपक भगत, सूर्यकांत छत्तिसे, सूरज कौठाळे, नवनाथ म्हस्के, किशोर वागस्कर, दत्ता दोरताले यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र विक्रमसिंह पाचपुते यांनी दिले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP announces student front in Shrigonda taluka