
अरुण नवथर
शिर्डी : मुखात ‘जय श्रीराम’... डोक्यावर भगवी टोपी अन् गळ्यात भाजपचा पंचा परिधान करून राज्यभरातील हजारो लाडक्या बहिणी आज मोठ्या आत्मविश्वासाने भाजपच्या महाविजय अधिवेशनात सहभागी झाल्या. केवळ सहभागच नव्हे, तर अधिवेशनस्थळी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत या लाडक्या बहिणींनी संपूर्ण अधिवेशनावर छाप सोडली.