पंकजा मुंडे शरद पवार यांच्याशी ‘कोयत्याचा’ सन्मान करण्यासाठी करणार चर्चा 

BJP leader Pankaja Munde will hold discussions for Sharad Pawar sugarcane workers
BJP leader Pankaja Munde will hold discussions for Sharad Pawar sugarcane workers

अहमदनगर : साखर कारखान्याने सुरु करण्याच्या सध्या हालचाली सुरु झाल्या आहेत. गावागावांमध्ये ऊसतोडण्यासाठी मंजुराची शोधमोहिम सुरु आहे. अनेक ट्रॅक्टरचालक व उसतोड कामगारांचे मुकादम कामगार पाहत आहेत. त्यातच ऊसतोडणाऱ्या कामागारांचे प्रश्‍न चर्चेत आले आहेत. त्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.

हेही वाचा : कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराच्या घशात गेल्या होत्या, त्यातूनच...
ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील कारखाने सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोना व्हायरसमुळे कामगारांमध्ये भिती आहे. अशा स्थितीत कामगार मिळणार का अशी शक्यता आहे. मराठवाड्यातून साखर कारखाने सुरु झाल्यानंतर ऊसतोड करण्यासाठी जाणारा कामगार वर्ग मोठा आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री व शरद पवार यांच्या चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. 

ट्विटमध्ये मुंडे यांनी म्हटलं आहे की, ‘माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जेष्ठ नेते खासदार शरद पवार, कारखानदारांचे प्रतिनिधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे.’

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत गेल्या ऊसतोड हंगामात ऊसतोड कामगारांना आपापल्या घरी सुरक्षितपणे पाठविण्यासाठी भाजप नेत्या मुंडे यांनी सरकारकडे आग्रह धरला होता. ऊसतोड कामगारांचा विषय महत्त्चाचा व संवेदनशील आहे, तो गंभीर आणि हाताबाहेर जाण्याआधी यात लक्ष घालावे, असे त्या म्हटल्या होत्या. बीड, अहमदनगरसह इतर काही जिल्ह्यातील काही गावेची- गावे ऊसतोडण्यासाठी स्थलांतरित होतात. त्या गावात फक्त आबालवृद्ध व लहान बालके राहतात. ऊसतोड कामगारांना योग्य मोबदला मिळवा, यासह त्यांना सुविधा मिळणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com