भाजपच्या बैठकीत आमदार विखे पाटील यांचे ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन

गौरव साळुंके
Saturday, 26 December 2020

ग्रामपंचायत निवडणूक आपापसांत समन्वय ठेऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक आपापसांत समन्वय ठेऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. मात्र निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनसेवा मंडळाकडून ती लढावी असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालायत विखे यांनी शहरासह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी आणि समर्थकांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, माजी सभापती दीपक पटारे, नानासाहेब शिंदे, डॉ. नितीन आसने, अशोकचे संचालक बबन मुठे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, गणेश राठी, नगरसेवक बाळासाहेब गांगड, केतन खोरे, नगरसेवक जितेंद्र छाजेड, सुनील वाणी उपस्थित होते.

याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी संवादाचे प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी गणेश मुदगुले, विश्वनाथ मुठे, नितीन आसने, भाऊसाहेब बांद्रे, मनोज छाजेड, सतीश सौदागर उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP meeting in Shrirampur taluka regarding Gram Panchayat elections