राज्य सरकारने कृषी विधायकावरील बंदी उठवावी; नेवाशात भाजपची मागणी

सुनिल गर्जे
Wednesday, 7 October 2020

राज्य सरकारने ही स्थगिती उठवावी व कृषी विधेयक राज्यात लागू करावे, यासाठी अशी मागणी केली आहे.

नेवासे (अहमदनगर) : राज्यातील महाआघाडी सरकारने केंद्राच्या कृषी विधेयकावरील बंदी उठवावी व शेतकरी हिताचे हे कृषी विधेयक राज्यात लागू करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेवासे तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली. 

नेवासे भाजपच्या वतीने तहसीलदार रुपेश सुराणा यांना देण्यात आलेल्या निवेदनात, 'केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या जिवनात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी ऐतिहासिक कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांना प्रस्थापितांच्या जाचातून मुक्त करण्याचे काम केले आहे. परंतू शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवणाऱ्या आघाडी सरकारने अपप्रचार करत या विधेयकाला महाराष्ट्र राज्यात स्थगिती दिली आहे.
 
राज्य सरकारने ही स्थगिती उठवावी व कृषी विधेयक राज्यात लागू करावे, यासाठी अशी मागणी केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, उपाध्यक्ष राजेश कडु, जिल्हा सचिव भाऊ नगरे, आप्पा गायकवाड, ज्ञानेश्वर टेकाळे, सह कोषाध्यक्ष संजय गवळी, माऊली पेचे, सचिन नागपुरे, सतिष गायके, संदिप आलवणे, प्रताप चिंधे, प्रशांत बहिरट यावेळी उपस्थित होते. 

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The BJP in Newase has demanded that the agriculture bill be implemented in the state