
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
कोपरगाव : ""संघटनात्मक पक्ष गुणात्मक व्हावा, यादृष्टीने काम केलेल्या कार्यकर्त्यांमुळेच भारतीय जनता पक्ष देशातच नव्हे, तर जगात अव्वल आहे. विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या घटकाला सामावून घेणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष होय,'' असे प्रतिपादन प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हेही वाचा - नगरचे कलेक्टर राहतात महालात
अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर होते. औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, सोशल मीडियाचे राज्य संयोजक प्रवीण अलई, जिल्हा संयोजक जालिंदर वाकचौरे, ऍड रवींद्र बोरावके, जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, कैलास खैरे, विनोद राक्षे, सतीश चव्हाण यांसह तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन केशव भवर यांनी केले. तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.