
अहिल्यानगर : भाजप हे भांडवलदारांच्या हिताचे रक्षण करत आहे. सरकारी शाळा बंद करून खासगी भांडवलदारांच्या शाळांना अनुकूल धोरण राबविले जात आहे. माणसे एकत्र राहून सत्तेविरोधात बंड करू नये, यासाठी सत्ताधारी भाजप सरकार जाती-धर्माच्या भिंती निर्माण करत आहे. मात्र, श्रमिक, माणसाला माणूस म्हणून जोडणारा पूल बांधण्याचे काम कम्युनिस्ट करत आहे. सर्वसामान्यांनी हे राजकारण समजावून घेऊन माणसाला माणसांशी जोडणारा पूल मजबूत करण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव डॉ. राम बाहेती यांनी केले.