esakal | ‘नवे पर्व'च्या नावाखाली दिशाभूल; प्रा. राम शिंदे यांची रोहीत पवारांवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Ram Shinde criticizes MLA Rohit Pawar

"नवे पर्व'च्या नावाखाली जनतेची दिशाभूल झाली. जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यांना सोशल मीडियावर मार्केटिंग करण्यात रस आहे. आम्ही केलेल्या कामाची उद्‌घाटने करण्यात ते धन्यता मानतात.

‘नवे पर्व'च्या नावाखाली दिशाभूल; प्रा. राम शिंदे यांची रोहीत पवारांवर टीका

sakal_logo
By
निलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : "नवे पर्व'च्या नावाखाली जनतेची दिशाभूल झाली. जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यांना सोशल मीडियावर मार्केटिंग करण्यात रस आहे. आम्ही केलेल्या कामाची उद्‌घाटने करण्यात ते धन्यता मानतात. विकासाच्या नावाखाली अशी ही बनवाबनवीचा प्रयोग चालला आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांच्यावर करत मोठं खेड ही ओळख पुसून कर्जतला शहराचे रूप दिले. आगामी निवडणुकीत विकासाला साथ द्या, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी केले. 

नगरपंचायतीच्या समर्थ गार्डन, शहा गार्डनसह विविध विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुजय विखे पाटील होते. नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी गोविंद जाधव, अशोक खेडकर, सचिन पोटरे, भामाबाई राऊत, डॉ. सुनील गावडे आदी उपस्थित होते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिंदे म्हणाले
, ""नवे पर्व म्हणत जनतेची दिशाभूल करून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी वर्षात एक तरी विकासकाम मंजूर करून आणले का, ते दाखवावे. अद्ययावत कोविड सेंटर कुठे आहे? आपण कर्जतसाठी सव्वाशे कोटींचा निधी मंजूर केला. त्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली.'' 

डॉ. विखे पाटील म्हणाले, "समर्थ गार्डन, शहा गार्डनमुळे कर्जतच्या वैभवात भर पडली. सध्याचे आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच सगळी मदत करीत असेल, तर राज्य सरकार करते काय? शेतकऱ्यांना दिलासा नाही. नैसर्गिक आपत्तीत मदत नाही.'' नामदेव राऊत म्हणाले, की स्वप्नातील कर्जत उभे करण्याचा शब्द गेल्या निवडणुकीत दिला होता. विकासकामांच्या माध्यमातून तो खरा केला. उपनगराध्यक्ष भैलुमे यांनी कर्जत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केल्याचे सांगितले. अमृत काळदाते यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर