भाजपचे काल दुधासाठी आंदोलन आज गुन्हे मागे घेण्यासाठी

विलास कुलकर्णी
रविवार, 2 ऑगस्ट 2020

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

राहुरी : सोनगाव येथे आज (रविवारी) महाविकास आघाडी सरकार व प्रशासनाच्या पुतळ्याचे दहन करून सोनगाव-सात्रळ-धानोरे परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांनी निषेध केला.  

राहाता येथे दूध आंदोलन प्रसंगी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, अण्णासाहेब म्हस्के व भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. महा विकास आघाडी सरकार व प्रशासनाने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

हेही वाचा - सीना धरण भरलंय बरं का

पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, संचालक सुभाष अंत्रे, उत्तम दिघे, राजेंद्र अनाप, जे. पी. जोर्वेकर, मच्छींद्र अंत्रे, वसंत डुक्रे, कारभारी ताठे, पाराजी धनवट, नारायण धनवट, सुर्यभान शिंदे, रंगनाथ शिंदे, विजय डुक्रे, उपसरपंच किरण अंत्रे, इजाज तांबोळी, बंटी कानडे, शाम अंत्रे, ऋषी अंत्रे, प्रदीप दिघे, बाळासाहेब अंत्रे, मोहम्मद तांबोळी यांनी आंदोलनात भाग घेतला. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's agitation again today