esakal | श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर ‘हे’ आहेत प्रशासक
sakal

बोलून बातमी शोधा

Bloc Development Officers Appoint Administrators for 15 Grampanchayat in Shrirampur Taluka

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेने दिले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर ‘हे’ आहेत प्रशासक

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेने दिले आहेत. त्यानुसार गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी  तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती केली. रविवारी (ता. 30) सदर ग्रामपंचायतीच्या काराभाराची मुदत संपत आहे. त्यामुळे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हेही वाचा : मालकीच्या वाहनांसाठी कृषी विभाग मारतोय पोलिस ठाण्यात हेलपाटे
प्रशासकांसाठी पंचायत समितीचे कर्मचारी, अंगणवाडी विभागासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रशासक नेमलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे मुठेवाडगा ग्रामपंचायतीसाठी शाखा अभियंता बाळू भालेराव, खानापूर ग्रामपंचायतीसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका उषा कासार, खोकर ग्रामपंचायतीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, वडाळा महादेव ग्रामपंचायतीसाठी कृषीविस्तार अधिकारी ए. बी. पावसे, मातापुर ग्रामपंचायतीसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका आशा देवी लिप्टे तर महांकाळवाडगाव ग्रामपंचायतीसाठी शाखा अभियंता नारायण गोराडे, भेर्डापूर ग्रामपंचायतीसाठी शाखा अभियंता एन. बी. ठोळे, नायगाव ग्रामपंचायतीसाठी जीबी गुंजाळ, 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टाकळीभान ग्रामपंचायतीसाठी विस्तार अधिकारी रावसाहेब अभंग, वळदगाव ग्रामपंचायतीसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका शोभा शिंदे आणि मालुंजा ग्रामपंचायतीसाठी शाखा अभियंता आर एस पिसे, गळनिंब ग्रामपंचायतीसाठी कृषी अधिकारी आर. व्ही. कडलग, बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीसाठी विस्तार अधिकारी एम. एस. अभंग व पढेगाव ग्रामपंचायतीसाठी विस्तार अधिकारी एन. आर. शेटे तर बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी शाखा अभियंता एस. एस. गडधे यांची प्रशासकपदी नियुक्त करण्यात आली आहे. या संदर्भात पंचायत समितीने नियुक्तीचा आदेश काढला असुन तालुक्यातील वरील 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक राज नेमण्यात आला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर