महिलेच्या मारेकरी अल्पवयीन मुली! बोल्हेगावातील खुनाचे गूढ उकलले; दोन महिलांचा समावेश, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ..

Ahilyanagar District Shocked: बोल्हेगावातील महिला खुनाचा उलगडा; दोन अल्पवयीन मुलींसह चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Ahilyanagar District Shocked as Bolhegaon Murder Puzzle Unravels

Ahilyanagar District Shocked as Bolhegaon Murder Puzzle Unravels

Sakal
Updated on

अहिल्यानगर: बोल्हेगाव येथील मनीषा बाळासाहेब शिंदे (वय ४०, रा. शनी मंदिराजवळ, कौस्तुभ कॉलनी, भारत बेकरी रोड) या महिलेच्या खुनाचे गूढ उकलले आहे. दोन अल्पवयीन मुलींसह दोन महिलांनी चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्राने हा खून केला आहे. आरोपी महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. घरात घुसलेल्या आरोपी महिलांना पाहून खून झालेल्या महिलेने आरडाओरड सुरू करताच आरोपींनी तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसांतच आरोपी महिलांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com