विमान कोसळलेल्या शृंगऋषी डोंगराच्या पायथ्याशी बॉंबसदृश वस्तू  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

या डोंगरावर साधारण पन्नास वर्षांपूर्वी एक लष्करी मालवाहू विमान कोसळले. या अपघातातील ती वस्तू असावी अशी शंका जुन्या लोकांनी व्यक्त केली

भाळवणी: येथील शृंगऋषी डोंगराच्या पायथ्याशी जुन्या काळातील बॉम्बगोळा आढळून आला. येथील सैनिक बॅंकेचे संचालक अरुण रोहकले, अभिजित रोहकले, डॉ. संजय बांडे हे व्यायाम करण्यासाठी बुधवारी सकाळी तेथे गेले असता त्यांना दगडी वरवंट्यासारखी वस्तू दिसली. जवळ जाऊन पाहिली असता ती वस्तू बॉंबसदृश असल्याचे जाणवले. 

हेही वाचा - फडणवीस तुम्ही राजभवनावरच थांबा म्हणजे तक्रारी करायला सोपे जाईल

या बाबत अरुण रोहकले यांनी प्रशासनास माहिती दिली. तहसीलदार ज्योती देवरे व पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी नगरच्या लष्करी अधिकाऱ्यांना बोलावून या संबंधीचा निर्णय घेणार आहे. सध्या त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुढील कारवाईसंदर्भात लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.

जाणून घ्या - अजिंक्य रहाणेच्या मामासोबत झालं असं...सगळे हळहळले

या डोंगरावर साधारण पन्नास वर्षांपूर्वी एक लष्करी मालवाहू विमान कोसळले. या अपघातातील ती वस्तू असावी अशी शंका जुन्या लोकांनी व्यक्त केली. दरम्यान, काल (ता. 20) सायंकाळी विंग कमांडर ए. के. भट्टाचार्य यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून ही बॉंम्ब सदृष्य वस्तून असल्याचा निर्वाळा दिला. 

या डोंगरावर 16 ऑगस्ट 1971 साली रशियन बनावटीच्या मालवाहू विमानाचा अपघात झाला होता. यात दहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी या विमानातील काही विखुरलेले बॉंम्ब जमिनीखाली नष्ठ केले होते.

- सुलतान शेख, सेवानिवृत्त सैनिक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bomb on the hill in Bhalwani