काम नसल्याने मामा-भाचे पुण्यातून घरी निघाले..पण त्यांच्यासोबत झालं असं

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

त्यांच्या खिशातील अधार कार्डवरूऩ त्यांची ओळख पटली. त्या नंतर त्यांच्या नातेवाईकांना कळवून पारनेर येथील ग्रामिण रूग्णालयात त्यांची उत्तरीय तपासणी करूण मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 

पारनेर : सासवड येथे वीटभट्टीवर काम  करणारे मामा-भाचे आपल्या गावी एकलहरे (ता. श्रीरामपूर ) येथे आपल्या दुचाकीवरून परतत होते. अज्ञात वाहानाच्या धडकेत दोघेही जागीच ठार झाले. नगर- पुणे महामार्गावर सुपे नजीक म्हसणे फाटा येथे हा अपघात झाला.  आज(ता.23) पहाटे साडेचार वाजणेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला.

या बाबत माहिती अशी की, दत्ता लक्ष्मण गांगुर्डे (वय22) व केशव हरीभाऊ बर्डे (वय26) ( दोघेही रा. एकलहरे ता. श्रीरामपूर) हे दोघेही आपल्या कुटुंबासह सासवड येथे वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होते. अाता काम बंद झाल्याने ते आपल्या गावी रात्री सासवडहून निघाले होते. त्यांनी आपल्या बायका-मुलांना एका चारचाकी वाहानातून पुढे पाठविले होते. हे दोघे मामा-भाचे आपल्या दुचाकीवरून (एम.एच.12 डी.यू.5301)गावी निघाले होते.

हेही वाचा - आदिवासी पाड्यातही शिरला कोरोना, शिक्षकास झाली लागण

काळाने मध्येच घाला घातला. त्यांना आपल्या गावापर्यंत पोहचता आले नाही. सुपेनजीक म्हसणे फाटा येथे त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहानाने जोरदार धडक दिली. त्यात हे दोघेह जागीच ठार झाले. त्यांच्या खिशातील अधार कार्डवरूऩ त्यांची ओळख पटली. त्या नंतर त्यांच्या नातेवाईकांना कळवून पारनेर येथील ग्रामिण रूग्णालयात त्यांची उत्तरीय तपासणी करूण मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 

या बाबत आज्ञात वाहान चालकाविरोधात सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवलदार आर. जे. साबळे करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both died in an accident on Pune road