शेततळ्यात बुडून चुलता-पुतण्याचा मृत्यू...

Both drowned in Akola lake ...
Both drowned in Akola lake ...
Updated on

अकोले: पिपळगाव निपाणी येथे चुलत्या-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजत घडली. 

दुपारी दोन वाजता रणरणत्या उन्हात कार्तिक सुनील गोर्डे पिंपळगाव निपाणी येथील शेततळ्यात पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. त्याच्या आजूबाजूला काही मुलेही उपस्थित होते. त्याने शेततळ्यात उतरून ट्युबवर बसून पोहण्यास सुरूवात केली. मात्र अचानक त्याचा तोल जाऊन तो ट्युबवरून निसटला  तो गटांगळ्या खात असल्याने मित्रांनी आरडाओरड सुरू केली.

तो आवाज ऐकून कार्तिकचे चुलते अनिल खंडू गोर्डे वय 40 हे धावत आले. ते पट्टीचे पोहणारे होती. त्यामुळे कोणताही विचार न करता शेततळ्यात उडी घेऊन त्यांनी कार्तिक यास वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनील इतका घाबरलेला होता की त्याने चुलते अनिल यांना जोराची कवळी घातली. ती सुटता सुटेना. त्यात शेततळ्यात खूप पाणी व शेवाळ असल्याने ते त्यात अडकले. बचावासाठी ते प्रयत्न करीत होते. परंतु त्यांचे पाय घसरत होते. त्यामुळे दोघेही शेततळ्यात बुडाले. चुलत्याला पोहता येत असतानाही स्वप्नीलने घातलेल्या कवळीमुळे त्यांना काहीच करता आले नाही. त्या धडपडीत त्यांचा मृत्यू झाला.

अनिल हा पट्टीचा पोहणारा होता. मात्र त्याला ही मृत्यूला सामोरे जावे लागले. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेऊन शेततळ्यातील पाणी कमी केले. दोघांनाही मृत अवस्थेत बाहेर काढले. चुलते पुतणे मृत झाल्या गावावर शोककळा पसरली. अकोले पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनसाठी मृतदेह अकोले रुग्णालयात पाठविले.
अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com