Breaking News ः श्रीगोंद्यातील ज्येष्ठ नेते सदाअण्णा पाचपुते यांचे निधन

Breaking News: Sadaanna Pachpute passes away
Breaking News: Sadaanna Pachpute passes away

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ राजकीय नेते सदाशिव ऊर्फ सदाअण्णा भिकाजी पाचपुते यांचे आज दुपारी निधन झाले. तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यातच त्यांची प्राण ज्योत मालवली. आमदार बबनराव पाचपुते यांचे ते बंधू होत. तालुक्यातील राजकारणाची धुरा त्यांच्याच खांद्यावर होती. पडद्यामागे राहून त्यांनी तालुक्यात चांगलाच जम बसवला होता. प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मंदिरात महाआरती केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com