esakal | नियतीचा डाव अन् लग्नाआधीच भंगली सुखस्वप्ने; भावी नवरीने संपविली जीवनयात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

bride suicide

लग्नाआधीच भंगली सुखस्वप्ने; भावी नवरीने संपविली जीवनयात्रा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

राहुरी (जि.अहमदनगर) : तिचा सहा महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला. लवकरच लग्न होईल, पतीबरोबर सुखाचा संसार सुरू होईल, अशी सुखस्वप्ने तिने पाहिली. मात्र, नियतीने वेगळाच खेळ मांडला. आणि क्षणार्धातच होत्याचे नव्हते झाले....(bride-suicide-at-home-marathi-news)

....आणि तिच्या आनंदाला दृष्ट लागली

शीतल राजेंद्र देठे (वय २२, रा. देवळाली प्रवरा) असे मृत तरुणीचे नाव आहे. अवघी एक एकर जमीन असल्याने, तिचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात. आजोबा गायींचा गोठा सांभाळतात. जानेवारीमध्ये शीतलचा साखरपुडा झाला. लग्नाची तयारी झाली. फक्त तारीख काढणे बाकी होते. मात्र, कुटुंबाच्या आनंदाला दृष्ट लागली. सोमवारी (ता. १२) रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान देवळाली प्रवरा येथे राहत्या घरात शीतलने विषारी औषध प्राशन केले. एवढ्यावरच ती थांबली नाही. घराच्या शेजारी असलेल्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. तिला तत्काळ लोणी येथे रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. काल (ता.१४) मंगळवारी दुपारी देवळाली प्रवरा येथे शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण समजले नाही. आज (बुधवारी) सायंकाळपर्यंत राहुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती.

लग्नाआधीच भंगली सुखस्वप्ने

भावी नवरदेव पोलिस कर्मचारी. तोही मुळचा राहुरी तालुक्यातीलच. मात्र, नोकरीनिमित्त ठाणे (मुंबई) येथे राहतो. चांगलं स्थळ मिळालं. मुलीनं नशीब काढलं म्हणून कुटुंबातील सर्वांना आनंदाने आभाळ ठेंगणे झाले होते; मात्र या आनंदावर विरजण पडले. तिने विषारी औषध प्राशन करून गळफास घेतला. भातुकलीच्या खेळामधल्या राणीसारखा अर्ध्यावर डाव सोडून तिने जीवनयात्रा संपविली.

हेही वाचा: साईसंस्थान विश्‍वस्तांसाठी निकष बदलणार? अधिसूचना जारी

हेही वाचा: लस न घेताच ऑनलाइन प्रमाणपत्र; लसीकरणाचा सावळा गोंधळ उघडकीस

loading image