

Historic British Dak Bungalow In Akole Lies In Ruins As Neglect Threatens Heritage And Tourism Potential Of Panjare
sakal
-शांताराम काळे
अकोले : स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासाची साक्ष देणारी पांजरे (ता. अकोले) येथील ब्रिटिशकालीन डाक बंगला सध्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी ब्रिटिश अधिकारी ज्या वास्तूत मुक्काम करीत होते, ती भक्कम दगडी बांधकाम, सागवान लाकडाचे दरवाजे-खिडक्या आणि दगडी फरशी यामुळे आजही त्या काळातील स्थापत्यकलेची साक्ष देत आहे. मात्र, देखभालीअभावी या ऐतिहासिक वास्तूला आता ‘भूत बंगल्याचे’ स्वरूप प्राप्त झाले आहे.