स्मरण ः आद्य क्रांतिकारक उमाजी नाईकांनी केलेच असे की इंग्रज रडायचे बाकी होते

The British were terrified of the revolutionary Umaji Naik
The British were terrified of the revolutionary Umaji Naik

संगमनेर ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेऊन आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी स्वराज्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध प्रथम सशस्त्र बंड उभारले. गुप्तहेरांकडून ब्रिटिशांच्या दळण-वळणाची साधने उध्वस्त केली.

इंग्रज, सावकार व वतनदारांची धन सामुग्री लुटून त्यांचे वाटप गोरगरिबांना करीत. खर्‍या अर्थाने सह्याद्रीच्या मातीतल्या या क्रांतिकारकांच्या कार्याची प्रेरणा आजही तरुणाईला स्फूर्तीदायी आहे. नाईक यांच्या कारवायांमुळे इंग्रज अधिकारी रडकुंडीला आले होते.

महाराष्ट्राला मानवतेच्या विकासाचे प्रेरणा स्त्रोत असलेल्या थोर राष्ट्रपुरुष व क्रांतिकारकांची परंपरा लाभली आहे. त्यांचा पुरोगामी व देशहिताचा विचार प्रत्येकाने जपण्याचे आवाहन नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले.

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेसच्यावतीने यशोधन कार्यालयात आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

तालुका रामोशी संघटनेचे अध्यक्ष व युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तान्हाजी शिरतार यांनी प्रति शिवाजी म्हणून ओळख निर्माण केलेल्या उमाजी राजेंनी मराठी मुलखात इंग्रजांविरुद्ध मोठी मोहीम सुरु केली होती. इंग्रजांविरुद्ध प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यात इंग्रजांच्या नोकर्‍या सोडाव्यात, सरकारला शेतसारा व पट्टी देऊ नये, असा उल्लेख केला होता. उमाजी नाईक यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक राहील असे सांगितले.

या वेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहळ, अजय फटांगरे, तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष सांगळे, प्रा. बाबा खरात, रमेश गफले, पी. वाय. दिघे, भास्कर पानसरे, नाईक राजे प्रतिष्ठानचे सोमनाथ माकरे, विकास जेडगुले, सचिन गोफणे, प्रकाश गुळवे आदी उपस्थित होते.

संपादन - अशोक निंबाळकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com