HSC Exam Day Turns Tragic as Brother Loses Life in Road Accident
Sakal
अहिल्यानगर
Accident News: भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू; बारावीचा पेपर देऊन बहिणीला घरी नेताना घटना, आई-वडीलांचा आक्राेश!
Family Mourns Death of young man in Road Mishap: दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; परीक्षेनंतर बहिणीला घरी नेताना दुर्दैवी घटना
शेवगाव : बारावीची परीक्षा संपल्यानंतर मावस बहिणीला दुचाकीवरून घरी घेऊन जाताना झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.१०) दुपारी दहिफळ रस्त्यावर एरंडगाव परिसरात घडली. समर्थ सोमनाथ लोखंडे (वय २१, रा. एरंडगाव समसुद, ता. शेवगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

