Jaydhrath Khakal: एमआयडीसीत नवीन सबस्टेशन उभारा : आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ; आमी संघटना व महावितरणच्या बैठकीत चर्चा

Build a New MIDC Substation: औद्योगिक ग्राहकांच्या तक्रारी, लोड शेडिंगची समस्या आणि वारंवार होणारे व्होल्टेज फरक यामुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याचे खाकाळ यांनी सांगितले. उद्योग क्षेत्राच्या स्थिरतेसाठी आणि नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सक्षम वीज पायाभूत सुविधा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
AMI Association Urges MSEDCL to Set Up New MIDC Substation

AMI Association Urges MSEDCL to Set Up New MIDC Substation

Sakal

Updated on

एमआयडीसीत नवीन सबस्टेशन उभारा : आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ; आमी संघटना व महावितरणच्या बैठकीत चर्चा

अहिल्यानगर, ता. २७ ः नगर एमआयडीसी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे उद्योजकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. उत्पादन ठप्प होणे, मशिनरी डाऊनटाईम, कर्मचारी व्यवस्थापनातील अडचणी, अशा अनेक समस्यांना उद्योजकांना सामोरे जावे लागत आहे. उद्योगांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व उद्योगधंदे वाढवण्यासाठी नवीन सबस्टेशन उभारण्याची मागणी उद्योजकांच्या आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी केली आहे.

आमी संघटना आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात उद्योजकांच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष खाकाळ यांनी वरील मागणी केली. खाकाळ यांनी बैठकीत एमआयडीसीतील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. विशेषतः डी. एफ. ए. आणि एल ब्लॉकमध्ये विजेचा पुरवठा खंडित होत असल्याचे उद्योगधंद्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. एमआयडीसीत विजेची मागणी झपाट्याने वाढत असताना विद्यमान वितरण यंत्रणा पुरेशी नाही. उद्योगांचे नुकसान थांबवायचे असेल, तर एमआयडीसीमध्ये नवीन सबस्टेशन उभारणे अत्यावश्‍यक असल्याचे सांगितले.

अहिल्यानगर मंडलाचे अधीक्षक अभियंता पान ४ वर

रमेशकुमार पवार यांनी सांगितले की, विजेचा वाढलेला भार हा खंडित पुरवठ्याचा मुख्य कारण आहे. एकाच लाईनवर जादा लोड आल्यामुळे पुरवठा खंडित होतो. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. उद्योगांनी काही दिवस धीर धरणे आवश्‍यक आहे. महावितरणमार्फत विजेची क्षमता वाढवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापारेषण विभागाकडून एमआयडीसी परिसरातील पारेषण लाईन अपग्रेड करण्याचे काम जलद गतीने सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मिलिंद भामरे यांनी दिली. त्यामुळे पुढील काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वीज क्षमता वाढणार असून, वीजखंडीत समस्यांमध्ये लक्षणीय घट होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीस आमी संघटनेचे महेश इंदानी, प्रफुल्ल पारेख, रोहन गांधी, सुमित सोनवणे, सुहास भिंगारे, राहुल कराळे, राजेंद्र शुक्रे, निनाद टिपूगडे, सागर निंबाळकर, स्वप्नील पारेख तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता मंगेश साळुंके, योगेश चव्हाण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाऊसाहेब कुमावत व सुनील राहिंज उपस्थित होते.

८५ पैसे

प्रतियुनिट रिबेट

अनेक उद्योजकांमध्ये नवीन आलेल्या स्मार्ट मीटर संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. या गैरसमजाला दूर करण्यासाठी महावितरणने स्मार्ट मीटर आणि जुने मीटर एकत्र लावून प्रत्यक्ष रीडिंग तुलना प्रात्यक्षिक देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना ८५ पैसे प्रतियुनिट रिबेट मिळणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com