
अहिल्यानगर: शहरासह भिंगार परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना धुळे जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. आरोपींनी चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे.