
Pedestrian crushed under a speeding bus while walking home; police begin investigation.
Sakal
अकोले : अकोले आगाराच्या बसने एका ४२ वर्षीय इसमाला चिरडल्याची दुर्दैवी घटना पिंपळगाव नाकविंदा येथे मंगळवारी (ता. १४) ८ ते ९ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेत गणपत भानुदास लगड (वय ४२) यांचा मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकोले आगाराची अकोले-देवगाव ही बस नेहमीप्रमाणे सायंकाळी देवगाव येथे मुक्कामी जात होती.