Ahilyanagar Crime: 'पांढरीपूल घाटात कारचालकाला लुटले'; प्रवाशांनी लघुशंकेचा बहाणा करून कार थांबवायला लावली अन्..

Shocking Incident in Pandharipool Ghat: पांढरीपूल घाट परिसरात नऊ ऑगस्टला पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कारमालक महेंद्र दिगंबर धांडे (वय ३०, रा. समतानगर, सिडको, नाशिक) यांनी १० ऑगस्ट रोजी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Ahilyanagar Crime
Ahilyanagar Crimesakal
Updated on

नगर तालुका: रात्रीच्या वेळी छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रवासी म्हणून कारमध्ये बसलेल्या तिघांनी कारचालकाला मारहाण करत लुटले. मोबाईल व पैसे काढून घेत कारमधून खाली उतरवून चारचाकी पळवून नेली. पांढरीपूल घाट परिसरात नऊ ऑगस्टला पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कारमालक महेंद्र दिगंबर धांडे (वय ३०, रा. समतानगर, सिडको, नाशिक) यांनी १० ऑगस्ट रोजी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com