esakal | देवदर्शनाला जाणाऱ्या प्रवाशांची कार दरीत कोसळली; पाच पलट्या घेऊनही तिघे सुखरुप
sakal

बोलून बातमी शोधा

The car has crashed in a 60 to 70 feet deep valley in Mahuli Ghat.jpg

पाच पलट्या घेऊनही कार मधील तिघे तरूण सुखरूप बचावले.

देवदर्शनाला जाणाऱ्या प्रवाशांची कार दरीत कोसळली; पाच पलट्या घेऊनही तिघे सुखरुप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बोटा (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात साठ ते सत्तर फूट खोल दरीत कार कोसळल्याची घटना रविवार ( ७ मार्च ) सकाळी घडली. पाच पलट्या घेऊनही कार मधील तिघे तरूण सुखरूप बचावले.

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, गुजरात येथील तीन तरूण कारने देवदर्शनासाठी भीमाशंकरला येथे जात होते. रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान कारसह  हे तरूण माहुली घाटातून जात असताना वळण रस्त्याचा अंदाज चालकाला न आल्याने कार थेट महामार्ग सोडून साठ ते सत्तर फूट खोल दरीत जाऊन  कोसळली. भर वेगातील कारने पाच पलट्या घेऊनही आम्ही सुखरूप बचावल्याचे या तरूणांनी सांगितले.

बांधकाम व्यावसायिकाचे बेपत्ता कुटुंब पुण्यात सापडले

घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग व घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाती कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. घडलेल्या घटनास्थळी मोठ मोठे दगडही असूनही हे तरूण बचावले. मागील महिन्याभरात याच ठिकाणी चालकांचे नियंत्रण सुटल्याने एक कार व मालवाहू ट्रक पलटी झाला होता. 
 

loading image