esakal | जेसीबीतून गुगालाची उधळण; गणेगाव येथे 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल, 20 जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

A case has been registered against 50 people for leaking Google from JCB in Ganegaon

गणेगाव येथे भाजपने राष्ट्रवादीचा पराभव करीत सर्व नऊ जागांवर दणदणीत विजय मिळविला. हा विजय साजरा करण्यासाठी सायंकाळी उमेदवारांची जेसीबीवरून मिरवणूक निघाली.

जेसीबीतून गुगालाची उधळण; गणेगाव येथे 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल, 20 जणांना अटक

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : ग्रामपंचायत निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जेसीबीवरून गुलाल उधळत, डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढणाऱ्यांना पोलिसांनी अडविले; पण कोणीच ऐकत नव्हते. अखेर दंगलनियंत्रण पथकाने थेट जमावावर हल्लाबोल केला. काठ्यांचा प्रहार होताच कार्यकर्त्यांना पळता भुई थोडी झाली. पथकाने घराघरांत घुसून, अंगावर गुलाल दिसेल त्याला बदडले. याप्रकरणी 20 जणांना अटक झाली. 50 जणांवर गुन्हे दाखल झाले.

हे ही वाचा : तीन ग्रामपंचायतींच्या निकालांवर हरकती
 
गणेगाव येथे भाजपने राष्ट्रवादीचा पराभव करीत सर्व नऊ जागांवर दणदणीत विजय मिळविला. हा विजय साजरा करण्यासाठी सायंकाळी उमेदवारांची जेसीबीवरून मिरवणूक निघाली. डीजेचा आवाज घुमला. जेसीबीवरून गुलालाची उधळण सुरू झाली. याबाबत पोलिसांना माहिती समजताच, तीन पोलिसांनी मिरवणूक बंद करण्याची विनंती केली; परंतु त्यांचे कोणीही मनावर घेतले नाही.

हे ही वाचा : नगरमध्ये रोहित पवारांची बल्ले बल्ले; विखे, राम शिंदेंना धक्का
 
याबाबत पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना कळविले. त्यांनी ही बाब पोलिस अधीक्षकांच्या कानावर घातली. सूत्रे हलली. दंगलनियंत्रक पथकाचे एक उपनिरीक्षक व 27 जणांचे पथक चार वाहनांतून गावात दाखल झाले. त्याने थेट मिरवणुकीवर हल्लाबोल केला. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भानगडे यांच्यासह 20 जणांना राहुरी पोलिस ठाण्यात आणले. 50 जणांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले.

loading image